ऐतिहासिक वाठार स्टेशनवर प्रवासी अद्यापही उन्हातच; निवारा शेड उभारण्याची प्रवाशांची मागणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, सातारा, दि. १२ जून : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील ऐतिहासिक अशा वाठार रेल्वे स्टेशन येथील ब्रिटिशकालीन, दगडी बांधकामातील अतिशय देखण्या इमारतीची सध्या ऐतिहासिक वास्तू म्हणून जपणूक करण्यात आली आहे. या वास्तूची नुकतीच अतिशय सुरेख डागडुजीही करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे येथील बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना साध्या निवाऱ्याअभावी भर उन्हातच बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे.

प्रवाशांची गैरसोय आणि प्रमुख मागणी:

  • रेल्वे स्टेशनचा एकीकडे विकास झाला असला तरी, परिसरातील बस स्थानकावर प्रवाशांसाठी साध्या निवाऱ्याचीही कोणतीही सोय नाही.

  • उन्हाळ्याच्या कडाक्यात आणि आता सुरु झालेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, बसची वाट पाहत उघड्यावर उभे राहणाऱ्या प्रवाशांचे, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

  • प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी तातडीने एक सुसज्ज आणि चांगली निवारा शेड उभारण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे.

(छायाचित्र सौजन्य: अतुल देशपांडे, सातारा)

Back to top button
Don`t copy text!