शेतकऱ्याने उभारले शिक्षणाचे मंदिर; पांडुरंग पवारांच्या कार्याचा नितीन बानुगडे-पाटील यांच्याकडून गौरव

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सरस्वती शिक्षण संस्थेचा १९ वा वर्धापनदिन आणि संस्थापक पांडुरंग पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त फलटणमध्ये विशेष सोहळा उत्साहात पार पडला.

स्थैर्य, फलटण, दि. २५ सप्टेंबर : स्वतःच्या आयुष्यातील शिक्षणाच्या अडचणींचे रूपांतर इतर मुलांच्या शिक्षणाच्या संधीत करणारे सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आणि मोठे आहे, असे प्रतिपादन प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.

प्रेरणादायी जीवनप्रवास

फलटण-कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात सरस्वती शिक्षण संस्थेचा १९ वा वर्धापनदिन आणि पांडुरंग पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने शिक्षण क्षेत्रात संस्थेची उभारणी करून दोन ज्युनिअर कॉलेज उभी केली. ही केवळ संस्थेची वाटचाल नसून शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याची प्रक्रिया असल्याचे बानुगडे-पाटील यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांची उपस्थिती

संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका संध्या गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना पांडुरंग पवार यांच्या शेतीपासून शिक्षण क्षेत्रापर्यंतच्या प्रवासाचा गौरव केला. या सोहळ्याला आमदार सचिन कांबळे-पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ कोळवडकर यांनी केले.

Back to top button
Don`t copy text!