फलटणच्या प्रणव सस्ते यांची स्टेट पॅनेल अंपायरपदी निवड; आमदार सचिन पाटलांकडून कौतुक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

निरगुडी येथील प्रणव सस्ते यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेट पॅनेल अंपायरपदी निवड झाली. या यशाबद्दल आमदार सचिन पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

स्थैर्य, फलटण, दि. २५ सप्टेंबर : निरगुडी (ता. फलटण) येथील प्रणव शांताराम सस्ते यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेट पॅनेल अंपायरपदी निवड झाली आहे. या महत्त्वपूर्ण यशाबद्दल आमदार सचिन पाटील यांनी प्रणव सस्ते यांचे विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांच्या उपस्थितीत कौतुक

प्रणव सस्ते यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी प्रणव यांचे वडील शांताराम सस्ते, शरद सस्ते, अमोल शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातून पुढे येत क्रिकेट क्षेत्रात मिळवलेल्या या यशाबद्दल प्रणव सस्ते यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Back to top button
Don`t copy text!