अंजनगाव मध्ये पालखीचे भव्य स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२३ । बारामती । श्री ब्रह्म मूर्ती संत श्रीपाद बाबा व ब्रह्म मूर्ती संत रामदास बाबा पालखी सोहळ्याचे कोळगाव ते पंढरपूर यात्रे निमित्त अंजनगाव येथे पालखी सोहळ्याचे मोठ्या दिमागदारांमध्ये रांगोळी फटाके आतिषबाजी स्वागत करण्यात आलेयावेळी अंजनगाव वर्तमळा येथे रिंगण करण्यात आले किरण परकाळे विक्रम परकाळे यांनी चहा पाण्याची व्यवस्था केली त्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था श्री बाळासाहेब शंकरराव परकाळे यांनी केली व संध्याकाळी विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये कीर्तन सेवा हरिभक्त  महाराज स्वप्निल महाराज दौंडकर यांनी मंत्रमुग्ध केली, व सकाळचा चहा नाश्त्याची सोय कै.श्री. बापूराव कृष्णा कुचेकर यांच्या स्मरणार्थ प्रशांत दादा या दोन्ही भावांनी केली व पालखीचे  प्रस्थावनाच्या वेळी दिंडी चालक राजाराम महाराज जगताप, प्रताप महाराज चव्हाण ,स्वप्निल महाराज दौंडकर , गुरुदास महाराज जगताप, हनुमंत महाराज कवितके, शांताराम महाराज इंदुरीकर,सर्वांचे स्वागत दिलीप दादा परकाळे (सरपंच ) बाळासाहेब परकाळे (मा. व्हाईस चेअरमन सोमेश्वर कारखाना )दादासाहेब मोरे (मार्केट यार्ड माजी संचालक) सुभाष परकाळे (तंटामुक्ती अध्यक्ष )दादासाहेब कुचेकर  (ग्राम सुरक्षा दल अध्यक्ष) सुरेश परकाळे (स्वराज्य फर्निचर सर्वस्व,) कुमारी वैष्णवी महाराज पवार.जालिंदर शेठ वायसे ,बापूराव सस्ते, वायसे मामा, विष्णुपंत भाऊ सस्ते, अरविंद परकाळे, सुरेश परकाळे, बाळासाहेब सस्ते, सव्वा लाख मामा ,जालिंदर जमदाडे ,मोटे गुरुजी, बापू मोरे, सर्जेराव पवार योगेश परकाळे, विराज परकाळे, व इतर ग्रामस्थ.


Back to top button
Don`t copy text!