फलटण येथील राज्यस्तरीय स्पर्धेत पलक मेहता हिने मिळवला प्रथम क्रमांक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण येथे डॉ. प्रसाद जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत फलटणच्या पलक रोहन मेहता या ६ वर्षाच्या चिमुकलीने प्रथम क्रमांक पटकावला.

फलटण येथे डॉ. प्रसाद जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त गायन व नृत्य स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने ऑडिशन घेऊन फायनल स्पर्धा जोशी हॉस्पिटल लक्ष्मीनगर, फलटण येथे घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये माण, खटाव, बारामती, भिगवन, तसेच अकलूजवरून स्पर्धक आले होते. या स्पर्धेत गायन स्पर्धेमध्ये स्वराली सुनिल गोखले फलटण हिने प्रथम क्रमांक, उदयनी ओमप्रशांत शिंदे फलटण हिने द्वितीय क्रमांक, ईश्वरी नामदेव गायकवाड साखरवाडी हिने तृतीय क्रमांक व ओमकार बाळू सूळ दहिवडी तसेच साईराज अतुल कुंभार यास उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच नृत्य स्पर्धेमध्ये पलक रोहन मेहता फलटण प्रथम क्रमांक, रिक्तम तन्मय सामंता द्वितीय क्रमांक, तसेच बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड कादंबरी हणमंत जाधव तृतीय क्रमांक, सिद्धी गिरीश मुनोत चतुर्थ क्रमांक तसेच स्निग्धा सुजय चव्हाण व परी सुरेश पवार यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सर्व विजेत्यांचे डॉ. प्रसाद जोशी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह रोख रक्कम तसेच प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांनाही प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या गायन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. श्रीनंद हळबे (संगीत शिक्षक) व श्री. अनंत नेरकर (संगीत शिक्षक) तसेच नृत्य स्पर्धेसाठी श्री. धोंडीबा कारंडे सर (पळशीची पीटी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक) व श्री. टी. पी. शिंदे सर (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक) यांनी कार्यभार सांभाळला.

कार्यक्रमाचे आयोजन मंगेश बोडरे, शिवाजी सोनवलकर, शिवराज भैय्या कदम, मोहन पवार, नितीन मदने, वैभव पोमणे, हर्षद कदम, हेमंत जाधव यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले तर आभार डॉ. प्राची जोशी यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने फलटणकर नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!