‘द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये पद्मिनी कोल्हापुरे आणि अशोक सराफ यांच्या ‘प्रवास’ची निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, दि.२२: ‘द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये (इफ्फी) होणाऱ्या चित्रपटांची निवड हा नेहमीच चित्रपटकर्मीसाठी औत्सुक्याचा विषय असतो. यंदाच्या 51 व्या ‘इफ्फी’ चित्रपट महोत्सवामध्ये ‘इंडियन पॅनारोमा फिचर फिल्म 2020’ च्या विभागात शशांक उदापूरकर दिग्दर्शित व अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे यांच्या अभिनयाने नटलेल्या ‘प्रवास’ या चित्रपटाची निवड झाली आहे.

‘प्रवास’ची निवड ‘इफ्फी’ या मानाच्या महोत्सवात होणे ही आमच्यासाठी बहुमानाची गोष्ट असल्याचे या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी सांगितले. आनंददायी प्रवासाची गोष्ट सांगत आयुष्याचे मर्म सांगणारा अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे अभिनीत या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘इफ्फी’ मध्ये सुद्धा हा चित्रपट आपला वेगळा ठसा उमटवेल असा विश्वास या चित्रपटाचे निर्माते ओम छंगानी यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!