
दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२२ । सातारा । डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने दिनांक 26 नोव्हेंबर 2022, संविधान दिन ते 6 डिसेंबर 2022, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी समान संधी केंद्रामध्ये महात्मा फुले, राजर्षी छ. शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत पोस्टर स्पेर्धेचे दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी महाविद्यालय स्तरावर आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर सर्वोत्कृट तीन पोस्टरची निवड करुन पोस्टर दिनांक दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत दुपारी 12.00 वा. पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सातारा येथे जमा करावेत. महाविद्यालयाकडुन जमा होणाऱ्या पोस्टरमधुन जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट तीन पोस्टर ची निवड करण्यात येईल. सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक – रु. 1000/-, व्दितीय – रु. 700/- तृतीय – रु.500/- बक्षीस स्वरुपात देण्यात येईल.तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन सहायक आयुक्त, श्री नितीन उबाळे यांनी केलेले आहे.