मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात २३ व २४ ऑगस्टला पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२४ | फलटण |
मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी व बारावीमधील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट व शनिवार, दि. २४ ऑगस्ट २०२४ या दोन दिवशी पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन मुधोजी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेनुसार इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये असणार्‍या खेळातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांच्यात स्पर्धेचे पोषक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धा घेण्याचा मुख्य हेतू आहे.

या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, २३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८.३० वा. मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांच्या हस्ते होणार आहे. श्री. डी. एम. देशमुख उपप्राचार्य, कनिष्ठ विभाग हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

या स्पर्धेमध्ये खो-खो (मुले, मुली), कबड्डी (मुले, मुली), अ‍ॅथलेटिक्स (१०० मीटर व ४०० मीटर धावणे), गोळाफेक (मुले – मुली) इत्यादी सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकारांचा समावेश केला आहे. या क्रीडा स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक खेळातील विजेते व उपविजेते खेळाडू यांना प्राविण्य प्रमाणपत्र व मेडल दिले जाणार आहे.

Back to top button
Don`t copy text!