‘गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी’ फूड फेस्टीव्हलचे १२ ते १४ मे दरम्यान आयोजन; खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते होणार उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ मे २०२३ | फलटण |
माऊली फाऊंडेशन आयोजित ‘गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी’ फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन दि. १२ मे २०२३ रोजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते सायंकाळी ५.३० वाजता अहिंसा मैदान, बारस्कर गल्ली, फलटण येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माऊली फाऊंडेशनने केले आहे. माऊली फाऊंडेशन, फलटणच्या वतीने दि. १२ ते १४ मे दरम्यान ‘गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी’ फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले असल्याची माहिती माऊली फाऊंडेशनचे संस्थापक अनुप शहा यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

या फूड फेस्टीव्हलमध्ये दि. १२ मे रोजी सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १.०० ते ४.०० रांगोळी स्पर्धा होतील. सायंकाळी ५.३० वाजता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते ‘गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी’ फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन संपन्न होणार आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व ‘आयुष्यमान भारत’ योजनेचे कार्ड वाटप करण्यात येणार आहे.

या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार्‍या स्टॉलधारकांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. तसेच लहान मुलांसाठी पाळणे, ‘जम्पिंग जपाक’ व ‘मिकी माऊस’ या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १३ मे रोजी सायंकाळी ५.०० वाजता फलटणमधील कलाकारांना संधी देण्यासाठी प्रसिद्ध नृत्यांगना कलर्स मराठी फेम धनश्री काटकर यांच्या लावणी नृत्य कार्यक्रम आयोजित केला आहे.

दि. १४ मे रोजी श्रीमंत छत्रपती राजमाता जिजाऊ पुरस्कार, राजमाता अहिल्यादेवी पुरस्कार, झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार हे सर्व पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत.

फूड फेस्टिव्हल दि. १२ ते १४ मे दररोज सायंकाळी ५.०० ते १०.०० या वेळेत सुरू राहणार आहेत. फलटणकर नागरिकांनी या फेस्टिव्हलचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनुप शहा यांनी केले आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली फाउंडेशनच्या विश्वस्त सौ. मनीषा नागावकर, सौ. पल्लवी भोजने, सौ. रूपाली साळुंखे, सौ. संगीता भोसले. सौ. पूनम मोहिते, सौ. हलीमा शेख, सौ. आसमा शेख, सौ. हेमा पोद्दार, सौ. मीनाक्षी लाडगे, सौ. रेखा यादव, सौ. कोरडे, सौ. लक्ष्मी काळे, कुमारी सिद्धाली शहा हे परिश्रम घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!