आळजापूर ग्रामपंचायत व संतकृपा फाऊंडेशन यांच्यावतीने घरगुती गौरी व गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२४ | फलटण |
गणेशोत्सवानिमित्त आळजापूर गावातील महिलांसाठी ग्रामपंचायत आळजापूर व संतकृपा फाऊंडेशन यांच्या वतीने घरगुती गौरी व गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास फिल्टर, द्वितीय क्रमांकास कुलर, तृतीय क्रमांकास मिक्सर, अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व महिलांसाठी विशेष भेटवस्तू दिली जाणार आहे.

प्रत्येक सहभागी स्पर्धकाच्या घरी जाऊन तज्ज्ञ परीक्षकांकडून सजावटीची पाहणी करण्यात येईल. सामाजिक संदेश देणार्‍या देखाव्यांचा स्पर्धेत प्राधान्याने विचार करण्यात येईल.

या स्पर्धा आळजापूरचे सरपंच व सरपंच परिषद फलटणचे तालुकाध्यक्ष शुभम नलवडे यांनी आयोजित केल्या आहेत. त्यांना उपसरपंच सौ. गीतांजली नलवडे यांनी विशेष सहकार्य केले आहे.


Back to top button
Don`t copy text!