
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २६ डिसेंबर २०२२ । फलटण । राज्यातील प्रसिद्ध उद्योजक, श्री निमजाई देवी इंडोमेंट ट्रस्ट, निंबळकचे अध्यक्ष व राज इन्फ्रास्ट्रक्चर, पुणेचे व्यवस्थापकीय संचालक रामसाहेब निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त निंबळक येथे आज दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
राज्यातील प्रसिद्ध उद्योजक व निंबळक गावचे सुपुत्र रामसाहेब निंबाळकर हे समाजाप्रती विविध उपक्रम नेहमीच राबवत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त निंबळक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन निंबळक ग्रामस्थांच्यावतीने ग्रामपंचायत पटांगणावर करण्यात आलेले आहे. तरी निंबळक गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असेही आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
