कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून आगावे गावात रानभाज्या व कृषी प्रदर्शनाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२४ | फलटण |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीरत्न व किसान क्रांती गटाबरोबर लांजा तालुक्यातील आगवे गावात रानभाज्या प्रदर्शन व कृषी प्रदर्शन आयोजित केले होते. आगावे गावचे सरपंच, ग्रामसेविका व कृषी विज्ञान केंद्र, लांजा येथील शिक्षक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथामिक शाळेमध्ये हा कार्यक्रम घेतला होता.

यावेळी एकूण २५ रानभाज्यांच्या औषधी गुणधर्मांची ओळख शेतकरी व इतर ग्रामस्थांना पटवून देण्यात आली. त्यात शेती सुधारसाठी नवीन पद्धती, जैविक खतांची माहिती, कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या आंबा, काजू, भात, नाचणी, नारळ व भाजीपाला यांच्या सुधारित जाती व शेती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती दिली.

कृषी विज्ञान केंद्र लांजाचे प्रमुख डॉ. एस. एस. चव्हाण यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत त्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, लांजाचे प्रमुख डॉ. एस. एस. चव्हाण व ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. जे. दुबळे व सरपंच श्री. प्रफुल्ल कांबळे, ग्रामसेविका सौ. सुवारे, उपसरपंच सौ. पूजा गुरव व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

विद्यार्थी कृषीरत्न गटाच्या विशाल सोनवणे, प्रणय नार्वेकर, साहिल कांबळे, सूरज इतकर, विनित फोलकर, प्रतिक नाईक, वेद तेंडुलकर, सौरभ शेडगे व किसान क्रांती कुणाल चव्हाण, अजय झाकड, रवींद्र हिलिम, कार्तिक पी., ऋत्विक रेड्डी, ओमकार पहेलकर, वैभव फुलसुंदर, विस्मय चेतन, अथर्व नवले यांनी विशेष परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!