
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरासह तालुक्यातील प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्यासह फेरफारच्या इतर सर्व कामांसाठी तालुकास्तरीय फेरफार अदालतीचे आयोजन फलटणच्या प्रांत कार्यालय येथील दरबार हॉलमध्ये शुक्रवार दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप म्हणाले की, मुदत पूर्ण झालेले सर्व प्रलंबीत फेरफार निकाली काढण्यात येतील. नवीन फेरफारासाठी अर्ज करता येईल. ॲानलाईन फेरफार नकला तात्काळ देण्यात येतील. मयत खातेदारांच्या वारस नोंदी घेण्यात येतील. फेरफारासंबंधी सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येईल.
