जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ चे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२३ । सातारा । जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी होणाऱ्या ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ चे आयोजन दिनांक 13 जुलै  2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नविन प्रशासकीय इमारत, बस स्टॅन्ड जवळ, सातारा येथे करण्यात येणार आहे.

सदर प्लेसमेंट ड्राईव्हसाठी 100 पेक्षा जास्त बारावी, आयटीआय उमेदवार तसेच डिप्लोमा इन इंजिनिअरिंग उमेदवारांना नोकरीची संधी आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करावा व स्वखर्चाने आपल्या कागदपत्रांसह सकाळी 11.00 वाजता कार्यालयात उपस्थित राहावे व ‘प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विभागामार्फत सहायक आयुक्त श्री सुनिल पवार यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!