दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
जोशी हॉस्पिटल प्रा.लि. व फलटण रोबोटिक सेंटर फलटण, जि. सातारा यांच्यातर्फे रविवार, दि. १५ ऑक्टोंबर २०२३ रोजी सजाई गार्डन, जाधववाडी, फलटण येथे ‘आपली – फलटण मॅरेथॉन २०२३’ या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा चार गटात व १५ कि.मी., १० कि.मी., ५ कि.मी. व ३ कि.मी. व रोबोटीक नी रिप्लेसमेंट झालेल्या पहिल्या ५० पेशंटची १.५ कि.मी.ची चालण्याची परेड अशी खेळविली जाणार आहे.
स्पर्धेचे गट व किलोमीटर खालीलप्रमाणे –
१) १८ ते ३० (पुरूष / महिला) – जोशपूर्ण युवा गट
२) ३१ ते ४५ (पुरूष / महिला) – सळसळती तरुणाई
३) ४६ ते ६४ (पुरूष / महिला) – प्रगल्भ प्रौढ
४) ६५ वर्षांवरील (पुरूष / महिला) – अनुभवी ज्येष्ठ
किलोमीटर
१५ कि.मी. मॅरेथॉन वेळ : सकाळी ६.०० वाजता
१० कि.मी. मॅरेथॉन : सकाळी ६.३० वाजता
५ कि.मी. मॅरेथॉन : सकाळी ७.०० वाजता
३ कि.मी. ची ज्येष्ठांसाठीची वाकेथॉन : सकाळी ७.३० वाजता
१.५ कि.मी.ची रोबोटीक पेशंटची सकाळी ८.०० वाजता
मॅरेथॉन पूर्ण केल्यावर प्रत्येक खेळाडूस एक फिनिशर मेडल मिळणार आहे. त्यानंतर भरपेट नाष्ट्याची सोय केली आहे.
सकाळी ९.३० वाजता मुख्य कार्यक्रम होऊन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप केले जाईल. दि. १२, १३ आणि १४ ऑक्टोंबरला सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत स्पर्धकांनी मॅरेथॉनचे किट घेऊन जावे. ज्यामध्ये टी-शर्ट, रनर बीब टोपी आणि एक आकर्षक गिफ्ट मिळेल.
मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी www.joshihospitalpvtltd.com या वेबसाईटवर करता येणार आहे. किंवा खालील क्यूआर कोड स्कॅन करावा.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ५००/- फक्त असून ते रजिस्ट्रेशन करताना ऑनलाईन पे करावयाचे आहे. मात्र, ३ कि.मी.मध्ये भाग घेणार्या ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही फी नाही.
ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२३ असून प्रत्येकाला मॅरेथॉन पूर्ण केल्याचे मेडल व ई-सर्टिफिकेट दिले जाईल. प्रत्येक गटात पुरूष/महिला प्रत्येकी पहिल्या येणार्या तिघांना बक्षीस दिले जाणार आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जोशी हॉस्पिटल प्रा.लि., फलटण यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल – ०२१६६-२२४०१३ आणि ०२१६६ – २२५०८२