सहकार विभागातील गट-क संवर्गातील उमेदवारांची १४ व १६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन परीक्षा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
राज्य शासनाच्या सहकार विभागातील गट – क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता दि. ०६/०७/२०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस. या कंपनीमार्फत सोमवार, दि. १४/०८/२०२३ आणि बुधवार, दि. १६/०८/२०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी यावर पाठविण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशपत्र डाऊनलोड करावयाची लिंक आणि याबाबतच्या सूचना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, वरील संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे आणि परीक्षेस येताना त्याची रंगीत प्रत सोबत ठेवावी. तसेच प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करणेची नोंद घ्यावी.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!