दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२४ | फलटण |
फलटणमधील मंगळवार पेठेत रात्री झालेल्या भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन एकाच्या गळ्यावर चॉपरने वार करण्याचा प्रयत्न केला, तर ही भांडणे सोडविण्यास गेेलेल्या दोघांना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची फिर्याद सागर संजय इंगळे (रा. आखरी रस्ता चौक, मंगळवार पेठ, फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी करण कानिफ घोलप, राहुल आकाश घोलप, प्रतिक सुदाम अडागळे (सर्व रा. मंगळवार पेठ, फलटण) या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा अधिक तपास सपोनि शिंदे करत आहेत.