फडतरवाडी (बुध) येथे कृषीदूतांनी दिले ‘टी’ आकाराच्या कलमाचे प्रात्यक्षिक


दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२४ | फलटण |
फडतरवाडी (बुध) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत ‘टी’ आकाराचे कलम करण्याचे प्रात्यक्षिक दिले.

कृषीदूत प्रतिक पाटील, निखिल ननावरे, भूषण पाटील, प्रतिक ननावरे, महेश जाधव, प्रथमेश निंबाळकर, श्रीतेज आवडे यांनी गुलाबाच्या रोपावर हे ‘टी’ आकाराचे कलम करून दाखवले.

यामध्ये त्यांनी या प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य जसे की कलम चाकू, सिकॅटर, गुलाबाचे रोप, वंशज कोंब, पॉलिथिन स्ट्रिप, इ. माहिती सविस्तररित्या शेतकर्‍यांना दिली, तसेच रुट स्टॉक रोपांवर ‘टी’ आकाराचा भाग बनला जातो व त्यावर वंशज निवडलेल्या गुलाबाच्या कांडीचा कोंब पॉलिथिन स्ट्रिपच्या साहाय्याने जोडला जातो, ही माहिती सविस्तर सांगितली. तसेच त्यांनी ‘टी’ आकारांच्या कलमाचे फायदे सांगितले. यावेळी शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

कृषीदूतांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर कार्यक्रम समन्वयक प्रा.निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, प्रा. संजय अडत सर यांचे मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!