फलटण बसस्थानकावर देशी बनावटीचे पिस्टल व ३ काडतुसांसह एकास पकडले

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण शहरातील बस स्टँड येथे २४ ऑगस्ट २०२४ रोजी १०.३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातील एक देशी बनावटीचे मेटलची बॉडी असेलेले पिस्टल (किंमत ७० हजार) व तीन जिवंत काडतुसांसह (किंमत ६०० रुपये) पकडले आहे.

या प्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशन ठाण्यात आरोपी रोहित सुरेश तावरे (वय ३४ वर्षे, मूळ रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास सपोनि नितीन शिंदे करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!