लकडे बाजाराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार


दैनिक स्थैर्य | दि. २४ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
गिरवी रस्त्यावरील जाधववाडी (ता. फलटण) गावाजवळील लकडे बाजारजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. विष्णू सोडमिसे असे त्यांचे नाव आहे.

विष्णू सोडमिसे (वय ५०, मूळ राहणार सोमंथळी, तालुका फलटण) हे त्यांच्या कुटुंबासह मुलांच्या शिक्षणासाठी साई मंदिर जाधववाडी येथे राहतात. दि.२४/२/२०२३ रोजी सकाळी पहाटे ५ वाजता जाधववाडी रोडला वॉकिंगसाठी गेलेले असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनचालक धडक देऊन फरार झाला आहे.

या प्रकरणी अधिक तपास फलटण शहर पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!