फलटणमध्ये इलेक्ट्रिक दुचाकीवर वीज पडून एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी


दैनिक स्थैर्य | दि. 12 मे 2024 | राजाळे | तालुक्यातील सरडे येथे ओला या इलेक्ट्रिक गाडीवर वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाली असल्याची घटना काल दि. 11 रोजी घडली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की; सरडे तालुका फलटण येथे ओला या इलेक्ट्रिक दुचाकीवर वीज कोसळून मोटर सायकलवरून जाणारे तीन व्यक्ती जखमी झाले होते. तिघांनाही बारामती येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. त्यापैकी एक जण उपचारादरम्यान मयत झाला आहे.

तिन्ही विद्यार्थी शारदानगर बारामती येथे आयटीआयचे शिक्षण घेत आहेत. दोघे जखमी विद्यार्थी यांची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर आहे. मयत विद्यार्थी याचे शवविच्छेदन शासकीय रुग्णालय बारामती येथे करून त्याचे पार्थिव शरीर त्याच्या नातेवाईकांची ताब्यात देण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!