
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 2 : कोडोली, ता. सातारा येथील नवीन गावठाणाजवळ सहा ते सातजणांनी एकाची दुचाकी अडवून हॉकीस्टीकने मारहाण केली. याबाबत माहिती अशी, कुणाल संपत इंगळे हे दि. 1 रोजी दुचाकीवरून जात असताना मोटारसायकलवरून सहा ते सातजण आले. त्यांनी कुणाल यांना तु रहिमतपूरचा आहेस काय असे विचारले. कुणाल यांनी हो असे सांगताच त्यांना सर्वजणांनी हॉकीस्टीकने डोक्यात, पाठीवर आणि तोंडावर मारहाण केली. यात कुणाल इंगळे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सुबोध चव्हाण रा. महागाव, ता. सातारा, विकी उमरे, ऋषिकेश जाधव, कुणाल मदने, अतूल (पूण नाव समजू शकले नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
