
दैनिक स्थैर्य | दि. ८ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटणच्या आंबेडकर चौकातील श्रीराम लॉजमध्ये उमेश यशवंत जाधव (वय ३८, रा. जाधववाडी, ता.फलटण, जि. सातारा) याने काल सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबतची खबर स्वप्निल राजेंद्र शिंदे (रा. जाधववाडी) यांनी पोलिसात दिली.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फलटणच्या आंबेडकर चौकातील श्रीराम लॉजमध्ये उमेश यशवंत जाधव (वय ३८, रा. जाधववाडी, ता.फलटण, जि. सातारा) याने काल सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास एका रूममधील फॅनला नायलॉनच्या दोरीने कोणत्यातरी कारणाने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
या घटनेचा अधिक तपास पो.ह. सोनवलकर करत आहेत.