
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २९ नोव्हेंबर २०२३ | फलटण | फलटण शहरातील एका पेट्रोलपंपावर पैसे सुट्टे करण्यासाठी आलेला इसम चक्कर येऊन पडल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली असल्याची चर्चा सध्या फलटणमध्ये सुरू आहे.
याबाबत सुरू असलेल्या चर्चेत अशी माहिती समोर आली की; शहरातील एका पेट्रोलपंपावर एक अनोळखी व्यक्ती आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरून झाल्यानंतर सुट्टे पैसे घेत असताना अचानक चक्कर येऊन तेथेच खाली पडला. त्याला तात्काळ उपचारासाठी रिक्षातून काहीजण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉटरांनी सांगितले.
आज दिवसभर फलटण शहरात विजेचा लपंडाव सुरू होता त्यामुळे वीज गेल्यानंतर वारंवार जनरेटर सुरू करावा लागत होता त्यामुळे कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. अश्यातच अशी घटना घडल्याने विविध चर्चांना उधाण आले.


