मलकापुर येथे ट्रकवरून पडून एकाचा मृत्यू


दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२२ । कराड । मलकापुर, ता. कराड येथे ट्रकवरून खाली पडून जखमी झालेल्या एकाचा कराड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मलकापुर येथील बैल बाजारामध्ये येरफळे, ता. पाटण येथील संदीप आनंदा मुकदम वय ३७ हा ट्रकवर रस्सी बांधत असताना रस्सी अचानक तुटून ते ट्रकवरून खाली पडून जखमी झाले होते. त्यांच्यावर कराड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दि. ७ ऑक्टोबर रोजी १०. १५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची खबर रुग्णालयाच्या सूत्रांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली.


Back to top button
Don`t copy text!