दैनिक स्थैर्य | दि. १२ जून २०२३ | फलटण |
फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते संजय अहिवळे यांनी आरक्षण, पेन्शन, वीजपुरवठा इ. मागण्यांसाठी फलटण प्रांत कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
मागासवर्गीय लोकांचा निधी वाढवावा, शेतकर्यांना वीज मोफत द्यावी व थकबाकी माफ करावी, मराठा समाजाला १३ टक्के, मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण मंजूर करावे. धनगर समाजाला ‘एसटी’चे आरक्षण मिळावे. सरकारी नोकरांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. मंडल अधिकार्यांचे पगार वेळेवर व्हावेत. पोलिसांना पक्की घरे बांधून द्यावीत व त्यांना पगार वाढ करावी, इ. विविध मागण्यांसाठी अहिवळे यांनी फलटण प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी अहिवळे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकार्यांकडे सुपूर्द केले.
दरम्यान, अहिवळे हे धूळदेव (तालुका फलटण) येथील धुळोबा मंदिरामध्ये दर रविवारी ढोल वाजवून आपल्या मागण्यांसाठी अनोखे आंदोलनही करीत आहेत. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा फलटण परिसरात सुरू आहे.