मुंजवडीत बेकायदा ताडी विक्री करताना एकजण ताब्यात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
मुंजवडी (ता. फलटण, जि. सातारा) येथे घराच्या आडोशाला मंगळवार, दि. ७ रोजी सायंकाळी ६.०५ वाजता जानू शरण्या सुंठले (वय ३९, राहणार मुंजवडी, ता. फलटण) हा बेकायदा ताडी विक्री करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे ९१०/- रूपयांची ताडी व साहित्य पोलिसांनी जप्त केले असून त्याच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार साबळे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!