
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. 22 डिसेंबर 2023 | फलटण | फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शनिवार दि. 23 डिसेंबर 2023 रोजी भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन नवलभाई मंगल कार्यालय येथे दुपारी १ वाजता करण्यात आले आहे.
यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असून श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
तरी इच्छुक रक्तदात्यांनी व फलटण तालुक्यातील सर्व गरजू व्यक्तीने आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
