श्रीमंत रामराजेंच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील मुलींना गणवेशाचे वाटप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२३ | फलटण |
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कै. शेवंताबाई पवार वाचनालय ग्रंथालय, साखरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आश्रमशाळेतील मुलींना गणवेशाचे वाटप करण्यात आले. हे गणवेश वाटप ‘महानंद’चे माजी व्हाईस चेअरमन डी. के. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर होते. यावेळी यश मल्टीस्टेटचे सर्वेसर्वा डॉ. राऊत तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. रमेश भोसले, उपाध्यक्ष श्री. शैलेश इंगळे, तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष डॉ. खानविलकर, चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवाजी भोसले, पंचायत समितीचे माजी सदस्य सागर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य हरिष गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम पवार, रविकांत गायकवाड, पत्रकार किसन भोसले, हनुमंत बोंद्रे, डॉ. आगा, रामभाऊ जगताप, गणेश गायकवाड तसेच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!