
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २० जानेवारी २०२४ | फलटण |
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या यांच्याकडून नव्याने बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिराच्या गाभार्यातील श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या तीर्थक्षेत्र येथे होत आहे. यानिमित्ताने फलटण येथे श्रीरामरक्षा, मंतपठण, भजन व महाआरती या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
हे सर्व कार्यक्रम कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन, मलठण येथे २२ जानेवारी रोजी सायंकाळी ९ ते ७ या दरम्यान संपन्न होणार आहेत.
यावेळी सर्व भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण तालुका व शहर भाजपा आध्यात्मिक आघाडी व महिला भाजपा आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
