भगवान महावीर जन्मकल्याणनिमित्त मूकबधिर विद्यालयात वही-पेन, फळांचे वाटप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ५ एप्रिल २०२३ | फलटण |
भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त महात्मा एज्युकेशन संचलित मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना वही-पेन व फळे वाटप करून महावीर जन्म कल्यांणक साजरे करण्यात आले.

यावेळी संगीनी फोरम अध्यक्षा अपर्णा जैन, सचिव प्रज्ञा दोशी, खजिनदार मनिषा घडीया, संगीनी माजी अध्यक्षा नीना कोठारी, संगीता दोशी, विद्यालयाच्या प्राचार्या देसाई मॅडम व बहुसंख्य संगीनी सदस्या उपस्थित होत्या.

प्रशालेकडून संगीनी अध्यक्षा अपर्णा जैन व पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्षा अपर्णा जैन यांनी सर्वांना भगवान महावीर जन्म कल्यांणकाच्या शुभेच्छा दिल्या. वर्षभरात संगीनी मार्फत विद्यालयात विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.

दीप्ती राजवैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सचिव प्रज्ञा दोशी यांनी आभार मानले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!