
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 28 नोव्हेंबर 2023 | फलटण | आज महात्मा फुले यांची पुण्यतिथी व पुण्यतिथी दिवशी फलटण शहरामध्ये असणाऱ्या महात्मा फुले चौकामधील बत्ती गुल झाल्याने फलटण नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फलटण नगरपरिषदेवर सुमारे दोन वर्षांपासून प्रशासक राज आहे; त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या ह्या खोळंबून राहत आहेत. अश्यामध्येच महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी दिवशीच महात्मा फुले चौकातील बत्ती गुल झाल्याने पुन्हा एकदा नगरपरिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
काहीवेळातच नगरपरिषदेच्या वतीने लाईट पुन्हा सुरू करण्यात आली आहे. काही काळ लाईट गेल्याने समाजातील अनेकांनी खेद व्यक्त केला.
