२० जुलै रोजी जिल्हाधिकारी कराड तालुक्यातील महसूल विषयक कामकाजाच्या अडचणी जाणून घेणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२२ । सातारा । प्रशासकीय कामाकाजाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह हे बुधवार दि. 20 जुलै 2022 रोजी कराड येथे  येणार असून या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 वेळेत मिटींग हॉल, चौथा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, कराड येथे कराड तालुक्यातील महसूल विषयक कामकाजाविषयी अडचणी जाणून घेवून मार्गदर्शन करणार आहेत.

ज्या नागरिकांना महसूल विषयक कामकाजाच्या अडचणी मांडावयाच्या आहेत त्यांनी बुधवार दि. 20 जुलै रोजी  वेळेत हजर रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!