सातारा जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने संत चरित्रावर सादर होणार मनोगते

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०७ फेब्रुवारी २०२३ । सातारा । सातारा जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने येत्या बुधवार दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी चार वाजता ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने संत चरित्रावर मनोगतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सर्व सभासदांसाठी खुला आहे अशी माहिती ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्ष श्रीमती ज्योती मोहिते व भिकाजीराव सूर्यवंशी यांनी दिली आहे. सातारा जेष्ठ नागरिक संघाच्या राजवाड्याजवळील श्री.छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) उद्यानातील सभागृहात बुधवार दि.८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती वैदेही देव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी वारकरी संप्रदायातील विविध संतांच्या चरित्रावर , त्यांच्या अभंगावर मनोगते व्यक्त करावीत. एखादा अभंग घेऊन त्यावर निरूपण करावे. या विषयावर सर्वांनी आपली मनोगते व्यक्त करावीत असे आवाहन खजिनदार मदनलाल देवी व सहकार्यवाह अशोक कानेटकर यांनी केले आहे. यावेळी फेब्रुवारी महिन्यात ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्या सदस्यांचा वाढदिवस आहे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.

Back to top button
Don`t copy text!