सलग 2 निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजकारण सोडण्याच्या तयारीत होते नितीश कुमार; अटल बिहारी यांच्यामुळे बनले मुख्यमंत्री


 

स्थैर्य,पटना, दि १६: ‘करना था इनकार, मगर इकरार कर बैठे…’ नितीश कुमार यांच्यावर हे गाणे तंतोतंत बसते. ना-ना करत ते अखेर 7 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. नितीश यावेळेस यामुळे मुख्यमंत्री बनण्यास नकार देत होते, कारण त्यांच्या पक्षाला निवडणुकीत फक्त 43 जागा जिंकता आल्या आहेत. नेहमी लहान भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपने 74 जागांवर मोठा विजय मिळवला. मुख्यमंत्री बनण्यास होकारही नितीश यांनी भाजपच्या आग्रहास्तव दिला आहे. रविवारी जेव्हा नितीश कुमार यांना NDA चा नेता म्हणून निवडण्यात आले, तेव्हा त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले होते, ‘मला मुख्यमंत्री बनायचे नाही. पण, भाजप नेत्यांच्या आग्रहास्तव मी मुख्यमंत्रीपद घेत आहे.’

नितीश कुमारांनी 7 दिवसांच्या मुख्यमंत्री पासून 7 व्यांदा मुख्यमंत्री बनवण्याचा प्रवास केला आहे. हा प्रवास जितका दिसतो, तितका सोपा नव्हता. नितीश कुमारांच्या आयुष्यात एक वेळ अशीही आली होती, जेव्हा दोन निवडणुका हरल्यानंतर राजकारण सोडून सरकारी गुत्तेदारीच्या क्षेत्रात उतरणार होते.

26 व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली, पण पराभव झाला

ही गोष्ट 1977 च्या बिहार विधानसभा निवडणुकीची आहे. नालंदा जिल्ह्यातील हरनौत विधानसभा क्षेत्रातून एक 26 वर्षीय तरुण जनता पार्टीच्या तिकीटावर निवडणुकीच्या मैदानात उतरला. त्या निवडणुकीत जनता पार्टीने 214 जागा जिंकल्या आणि 97 ठिकाणी पराभव झाला. या 97 पराभूत जागेंमध्ये हरनौतेदखील होती. या ठिकाणावरुन पराभूत झालेला तरुण होता नितीश कुमार. नितीश यांचा भोला प्रसाद सिंह यांच्याकडून पराभव झालो होता.

पहिला पराभव विसरुन नितीश 1980 मध्ये जनता पार्टी (सेक्युलर)च्या तिकीटावर निवडणुकीत उतरले. या निवडणुकीतही नितीश यांना पराभवाचा सामना करावा लागला. यावेळेस ते अपक्ष अरुण कुमार सिंह यांच्याकडून पराभूत झाले. अरुण कुमार सिंह यांना भोला प्रसाद सिंहचे समर्थन होते. या पराभवानंतर दुःखी होऊन नितीश यांनी राजकारण सोडण्याचा विचार केला.

तिसऱ्या प्रयत्नात आमदार झाले

सलग दोन निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नितीश यांनी 1985 मध्ये परत एकदा हरनौतमधून निवडणुक लढवली. यावेळेस लोकदलमधून. या वेळेस नितीश यांनी काँग्रेसच्या बृजनंदन प्रसाद सिंह यांना 21 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले. नितीश यांनी 1995 मध्ये शेवटची विधानसभा निवडणूक लढवली होती. पण, त्यानंतर राजीनामा देऊन 1996 ची लोकसभा निवडणूक लढवली.

पहिले विधानसभा आणि नंतर लोकसभेत पोहोचले

1985 मध्ये पहिल्यांदा आमदार बनल्यानंतर नितीश 1989 च्या लोकसभा निवडणुकीत बाढ़मधून विजयी होऊन लोकसभेत पोहोचले. यानंतर 1991 सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. नितीश आतापर्यंत 6 वेळेस लोकसभेवर निवडणूक गेले आहेत. नितीश यांनी आपली शेवटची लोकसभा निवडणूक 2004 मध्ये लढली होती.

अटलजीच्या सांगण्यावरुन मुख्यमंत्री बनले

2000 च्या बिहार विधानसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. तेव्हा अटल बिहार सरकारमध्ये कृषीमंत्री असलेल्या नितीश कुमार यांना भाजपच्या समर्थनावर 3 मार्च 2000 ला बिहारचा मुख्यमंत्री बनवण्यात आले. पण, बहुमत नसल्यामुळे सात दिवसानंतर सरकार कोसळले.

2004 मध्ये नितीश कुमार NDA तून वेगळे झाले आणि लालू यादव यांच्यासोबत UPA-1 मध्ये मंत्री बनले. लालू रेल्वे मंत्री आणि नितीश कोळसा आणि स्टील मंत्री होते. पण, नितीश यांची नजर बिहारच्या मुख्यमंत्री पदावर होते. 2005 च्या विधानसभा निवडणुकीत ते परत NDA मध्ये आले. ऑक्टोबर 2005 च्या निवडणुकीत NDA ला स्पष्ट बहुमत मिळाले आणि नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री बनले.

2013 मध्ये परत NDA पासून वेगळे झाले

2013 मध्ये भाजपकडून नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केल्यानंतर नाराज झालेल्या नितीश कुमार यांनी एनडीएची साथ सोडली. 2015 मध्ये नितीश, राजद आणि काँग्रेससोबत महाआघाडीत सामील झाले. निवडणुकीत महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. राजदने 80, जदयूने 71 आणि काँग्रेसने 27 जागांवर विजय मिळवला. यावेळी नितीश कुमार मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री बनले.

जुलै 2017 मध्ये तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यानंतर नितीश यांनी महाआघाडीतून वेगळे होऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 26 जुलैला नितीश NDA च्या समर्थनावर सहाव्यांदा मुख्यमंत्री झाले. नितीश आता एनडीएच्या समर्थनावर सातव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!