निंभोऱ्यात उपसरपंचांकडे चार्ज, नूतन सरपंचांची निवड बनाव : अमित रणवरे


दैनिक स्थैर्य | दि. 12 मार्च 2024 | फलटण | निंभोरे (ता. फलटण) गावचे सरपंच (राजे गट) यांच्यावर आर्थिक अपहार झाला म्हणून काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी त्यांचे सदस्यत्व आणि सरपंचपद रद्द केले होते. ती तक्रारही उपसरपंच आणि सदस्य (राजे गट) यांनीच केली होती; परंतु पुन्हा त्यांना निलंबित होण्यापासून वाचविण्याचा अतोनात प्रयत्न राजे गटाकडून झाला, मात्र न्यायदेवतेने योग्य न्याय दिला, शेवटी ‘सत्यमेव जयते’ होऊन सरपंचपद रद्द झाले आहे; असे मत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अमित रणवरे यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना रणवरे म्हणाले की; सद्य:स्थितीत जोपर्यंत सरपंचपदाची निवड होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीचे कामकाज उपसरपंच यांच्याकडे वर्ग होते. त्यासाठी निंभोरे ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग बोलवण्यात आली होती. ती संपन्न झाली. या मिटींगला खासदार गटाच्या चार महिला ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होत्या.

मौजे निंभोरे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच यांना निलंबित केल्यानंतर भारतीय जनता पार्टी (खासदार गट) यांचे पाच सदस्य ग्रामपंचायतीमध्ये काम पाहत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (राजे गट) यांच्याकडे तीन सदस्य आहेत. लवकरच निंभोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या (खासदार गटाच्या) सदस्या सरपंच म्हणून विराजमान होतील; असेही अमित रणवरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना रणवरे म्हणाले की; फलटण तालुक्यात काल असे भासवले गेले आहे की, ग्रामपंचायत सरपंच निवडणूक झाली आहे; परंतु सत्य परिस्थिती ही आहे की, विद्यमान सरपंच निलंबित झाल्यामुळे त्यांचा चार्ज हा उपसरपंच यांच्याकडे जातो, हा नियम आहे. सरपंचपदाची निवडणूक होईपर्यंत कामकाज हे उपसरपंच यांच्याकडे जाते. त्यानुसार सध्याच्या उपसरपंचांकडे सरपंचपदाचा चार्ज आला आहे.


Back to top button
Don`t copy text!