निंबळकच्या शिरपेचात मानाचा तुरा: गजानन चव्हाण आणि तानाजी बोराटे यांची पोलीस दलात निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

नवी मुंबई पोलीस दलात गजानन चव्हाण तर एसआरपीएफमध्ये तानाजी बोराटे यांनी मारली बाजी; उद्योजक राम निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार.

स्थैर्य, निंबळक, दि. ११ जून : निंबळक येथील दोन सुपुत्रांनी आपल्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर पोलीस दलात यश मिळवून गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. गजानन अंकुश चव्हाण यांची नवी मुंबई पोलीस दलात, तर तानाजी सावता बोराटे यांची राज्य राखीव पोलीस बलात (SRPF) निवड झाली आहे. या दोन्ही यशस्वी तरुणांचा निंबळकचे प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

तानाजी बोराटे यांची संघर्षमय भरारी

तानाजी बोराटे यांचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत असतानाच त्यांच्यावर वडिलांचे छत्र हरपल्याचा मोठा आघात झाला. मात्र, या धक्क्यातून सावरून तानाजी यांनी खचून न जाता जिद्दीने आपले प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या या अथक परिश्रमाचे फळ म्हणून त्यांची राज्य राखीव पोलीस बल (SRPF) मध्ये निवड झाली आहे.

गजानन चव्हाण यांचे दैदिप्यमान यश

निंबळकचे दुसरे सुपुत्र गजानन अंकुश चव्हाण यांनीही आपल्या कष्टाच्या आणि चिकाटीच्या जोरावर नवी मुंबई पोलीस दलात मानाचे स्थान मिळवले आहे. त्यांच्या या निवडीमुळे निंबळक गावाचा नावलौकिक वाढला असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राम निंबाळकर यांच्या हस्ते विशेष सत्कार

या दोन्ही तरुणांच्या यशाची दखल घेत प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांनी त्यांचा सत्कार करून पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “कौटुंबिक दुःख बाजूला सारून तानाजीने जे यश खेचून आणले आहे, आणि गजाननने कष्टाच्या जोरावर जी बाजी मारली आहे, ते परिसरातील तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.” राम निंबाळकर यांनी या दोन्ही तरुणांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!