
थेट WhatsApp वर मिळवा
गेल्या दोन वर्षांतील सत्ता बदलामुळे फलटण तालुक्यातील निंबळकच्या विकासाला मोठी गती मिळाली असून, राम निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून गावाला ५ कोटींचा विकास निधी मिळाला आहे.
स्थैर्य, निंबळक, दि. १८ नोव्हेंबर : गेल्या काही वर्षांत फलटण तालुक्यात झालेल्या सत्ता बदलामुळे तालुक्यात अनेक मोठी विकासकामे मार्गी लागताना दिसत आहेत. याच सत्ता बदलाचा मोठा फायदा निंबळक गावाला झाला असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत गावाला ५ कोटी रुपयांचा भरघोस विकास निधी मिळाला आहे. या विकासकामांच्या माध्यमातून गावाचा गेल्या ३० वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यात राम निंबाळकर यांना मोठे यश आले आहे.
राम निंबाळकरांच्या शब्दाला मोठे वजन
निंबळकच्या विकासासाठी राम निंबाळकर यांनी सुचवलेली आणि मागणी केलेली कामे प्रशासकीय पातळीवर अत्यंत वेगाने मार्गी लागताना दिसत आहेत. त्यांच्या शब्दाला तालुक्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठे वजन प्राप्त झाले आहे. त्यांनी तालुक्याच्या सत्तेत स्वतःसाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी कधीही वैयक्तिक वाटा मागितला नाही, तर नेहमीच गावाच्या सार्वजनिक हिताची कामे मागून ती पूर्णत्वास नेली आहेत.
३० वर्षांच्या तुलनेत दोन वर्षांत मोठा विकास
गेली ३० वर्षे निंबळकला जो निधी मिळाला, त्याच्या कितीतरी पटीने अधिक निधी केवळ या दोन वर्षांत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.
यामुळे गावातील बहुतांशी प्रलंबित विकासकामे मार्गी लागली आहेत. राम निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे निंबळकचा सर्वांगीण विकास शक्य झाला असून, ग्रामस्थांमधून याबद्दल मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.




