
थेट WhatsApp वर मिळवा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे कराडचे उदयसिंह पाटील आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १८ नोव्हेंबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून, यामध्ये महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड येथील उदयसिंह पाटील, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे फलटण येथील माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत सध्या महायुतीची म्हणजेच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची एकत्रित सत्ता आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि संचालकांनी एकत्रित बसून घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार या दोन्ही प्रमुख पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत. महायुतीच्या या एकजुटीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर महायुतीची मजबूत पकड असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
अध्यक्षपदी निवड झालेले उदयसिंह पाटील हे कराड येथील असून, त्यांचा सहकार आणि राजकीय क्षेत्रात मोठा दांडगा अनुभव आहे. तर, उपाध्यक्षपदी निवड झालेले दीपक चव्हाण हे फलटणचे माजी आमदार आहेत.





