निळकंठ निंबाळकर गुणवंत शिक्षक पुरस्कार माजी खासदार राजू शेट्टी यांच्याहस्ते प्रदान


दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२२ । गोखळी । महात्मा फुले इतिहास अकादमी, राष्ट्रसेवा समूह पुणे, रयत प्रकाशन पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे श्री जानाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राजाळे येथील उपक्रमशील शिक्षक निळकंठ निंबाळकर यांना माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते नुकताच पुणे येथे प्रदान करण्यात आला.

पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन निळकंठ निंबाळकर यांना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी श्रीमंत कोकाटे, चित्रलेखा संपादक ज्ञानेश महाराव, डॉ. कुंजीर आणि महात्मा ज्योतिराव इतिहास अकादमी चे पदाधिकारी व निमंत्रित उपस्थित होते.


Don`t copy text!