
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, वडुज, दि.२१: शंभू सेना सामाजिक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकजी राजेशिर्के यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली असून जिल्हाध्यक्षपदी निखिल तानाजी निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी सातारा जिल्हा सचिव दत्तात्रय भोसले, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक शाखा वडूज मॅनेजर हिरामण आढाव, फलटण तालुका अध्यक्ष शुभम माने, फलटण तालुका उपाध्यक्ष रोहन सावंत, सचिव निलेश जेधे ,नाभिक समाजसेवक ऋषीकेश काशिद उपस्थित होते.
खटाव तालुक्यातील कार्यकारणी जाहीर
यावेळी संघटनेची खटाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये खटाव तालुका अध्यक्षपदी अतुल बबन घार्गे – गणेशवाडी (औंध), खटाव तालुका उपाध्यक्ष रोहन घार्गे – खरशिंग, उपाध्यक्ष बापूराव घाडगे – पाचवड, सचिव शुभम कदम – औंध, सहसचिव विशाल जाधव – नांदोशी, सरचिटणीस हर्षल पवार – अंबवडे, तालुका संपर्क प्रमुख विक्रम कदम – पुसेसावळी, संघटक संग्राम माने – पुसेगाव, प्रसिद्धी प्रमुख यश फडतरे – गोसाव्यांची वाडी यांचा समावेश आहे.



