फलटण शहरात ‘नाईट कर्फ्यू’ : पोलीस निरीक्षक भारत किंद्रे रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत सर्व व्यवहार बंद; नियमांचा भंग केल्यास कारवाई


स्थैर्य, फलटण दि.२९: फलटण शहरामध्ये तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने सातारा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवार, दि.28 मार्च 2021 रोजीच्या रात्रीपासून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या आदेशाचे पुढील आदेश निर्गमीत होईपर्यंत उल्लंघन करणार्‍या व्यक्तींवर तसेच दुकानदारांवर योग्य ती कारवाइॅ करण्यात येणार असून फलटण नागरिक, व्यावसायिक यांनी याची नोंद घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी केले आहे.

दरम्यान, सदर आदेशाची माहिती शहरात काल दि.28 रोजी पोलीसांनी संचालन करुन नागरिकांपर्यंत पोहचवली. यामध्ये 3 पोलीस अधिकार्‍यांसह 20 पोलीस अंमलदार, 5 होमगार्ड सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!