स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

एमजी मोटर इंडियाद्वारे ‘नेस्क्ट-जनरेशन हेक्टर’चे अनावरण

ऑटोनॉमस लेव्हल २ (एडीएएस) तंत्रज्ञानाने सुसज्ज

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 10, 2023
in इतर

दैनिक स्थैर्य । दि. १० जानेवारी २०२३ । मुंबई । एमजी मोटर इंडियाने आज नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचे अनावरण केले. या कारमध्ये अनेक उत्साहवर्धक नवीन तंत्रज्ञान, सर्वोत्तम वैशिष्ट्ये व आरामदायी ड्रायव्हिंग वैशिष्ट्य समाविष्ट आहे. नेक्स्ट-जनरेशन हेक्टर अधिक सर्वोत्तम सुरक्षितता व ड्रायव्हिंग सोयीसुविधेसह ऑन-रोड अनुभव वाढवण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. नवीन एसयूव्हीमध्ये नवीन आकर्षक एक्स्टीरिअर व लक्ष वेधून घेणारे इंटीरिअर्स, सुधारित सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत आणि आकर्षक डिझाइन एलीमेंट्स अनपेक्षित ड्राइव्ह व युजर अनुभव देतात. ५, ६ व ७-आसनी कन्फिग्युरेशनमध्ये सादर करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये इंटेलिजण्टली डिझाइन केलेले सीटिंग पर्याय, आकर्षक इंटीरिअर्स आणि एैसपैस जागा आहे.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, ‘‘आम्ही २०१९ मध्ये लाँच केल्यापासून एमजी हेक्टरला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी आमच्या ग्राहकांचे आभार मानतो. हेक्टरने पहिल्यांदाच इंटरनेट कारचा अनुभव दिला. ही नेक्स्ट-जनरेशन हेक्टर लुक्स, इंटीरिअर्स व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एमजी हेक्टरचा दर्जा वाढवते. ही कार आमच्या एमजी शील्ड प्रोग्रामच्या आश्वासनासह येते, जे आमच्या ग्राहकांना विनासायास व सुलभ मालकीहक्क अनुभव देते आणि ग्राहक आता भारतभरातील आमच्या ३०० केंद्रांमध्ये स्वत:हून नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचा अनुभव घेऊ शकतात.’’

ऑटोनॉमस लेव्हल २ एसयूव्हीमध्ये ११ अडवान्स्ड ड्रायव्हर असि‍स्टण्स सिस्टम्स (एडीएएस) वैशिष्ट्यांसह ट्रॅफिक जॅम असिस्ट (टीजेए) व ऑटो टर्न इंडिकेटर्स आहेत, ज्यामधून परिपूर्ण मन:शांती, सुरक्षितता व आरामदायीपणाची खात्री मिळते. इंटेलिजण्ट ट्रॅफिक जॅम असिस्ट (टीजेए) वेईकलला लेनच्या मध्यभागी आणि पुढील बाजूस असलेल्या वेईकलपासून सुरक्षित अंतर ठेवत वाहतूक कोंडीच्या स्थितीत किमान प्रयत्न व अधिक सुरक्षिततेची खात्री देते.

नेक्स्ट जनरेशन एमजी हेक्टरमध्ये नवीन सादर करण्यात आलेले स्मार्ट ऑटो टर्न इंडिकेअर्स देखील त्रासमुक्त व सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव देतात. स्टीअरिंग अँगलवर आधारित संबंधित इंडीकेटर लाइट आपोआपपणे ऑन/ऑफ होते. हे ऑटोमॅटिक सिग्नल पार्किंगमधून रस्त्यावर येताना किंवा यू-टर्न घेताना ड्रायव्हर इंडीकेटर देण्यास विसरला तर उपयुक्त ठरेल.

नवीन एसयूव्हीमध्ये भारतातील सर्वात मोठी ३५.५६ सेमी (१४-इंच) एचडी पोर्ट्रेट इन्फोटेन्मेंट सिस्टमसह ब्रॅण्ड-न्यू युजर इंटरफेस आहे. तंत्रज्ञान नवोन्मेष्कारी फर्स्ट-इन-सेगमेंट डिजिटल ब्ल्यूटूथ की आणि की शेअरिंग क्षमतेमध्ये समाविष्ट आहे. इमर्जन्सीमध्ये किंवा चावी हरवल्यास डिजिटल की वेईकल लॉक, अनलॉक, स्टार्ट व ड्राइव्ह करण्यासाठी वापरता येऊ शकते. रिमोट लॉक / अनलॉक वैशिष्ट्याचा वापर करत कार कुठूनही अनलॉक करता येऊ शकते. की-शेअरिंग फंक्शनसह जवळपास दोन व्यक्तींना अतिरिक्त की शेअर करता येऊ शकते.

तसेच नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये ७५ हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्यांसह १०० वॉईस कमांड्स आहेत, ज्याचे श्रेय क्रांतिकारी आय-स्मार्ट तंत्रज्ञानाला जाते, ज्यामध्ये स्मार्टर व आनंददायी ड्राइव्हसाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कनेक्टीव्हीटी, सर्विसेस व अॅप्लीकेशन्स आहेत.

नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये इतर प्रमुख सुरक्षितता वैशिष्ट्ये देखील आहेत, जसे ६ एअरबॅग्स, ३६०-डिग्री, एचडी कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीसीएस), हिल असिस्ट कंट्रोल (एचएसी), ऑल फोर-व्हील डिस्क ब्रेक्स, सर्व आसनांसाठी ३-पॉइण्ट सीट बेल्ट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक (ईपीबी)आणि फ्रण्ट पार्किंग सेन्सर्स.

५, ६ व ७-आसनी कन्फिग्युरेशन्समध्ये सादर करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टर प्लसमध्ये इंटेलिजण्टली डिझाइन केलेले सीटिंग पर्याय, आकर्षक इंटीरिअर्स व एैसपैस जागा आहे. इंटीरिअर्स ड्युअल-टोन अर्जाइल ब्राऊन व ब्लॅक थीमसह वूडन फिनिशमध्ये उपलब्ध आहेत. ६-आसनी एसयूव्ही सीट्स कॅप्टन कन्फिग्युरेशनमध्ये येतात, तर ७-आसनी वेईकलमध्ये बेंच सीट्स आहेत.

नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये अद्वितीय कार मालकीहक्क प्रोग्राम ‘एमजी शील्ड’ विक्री-पश्चात्त सेवा पर्यायांचा समावेश आहे. तसेच ग्राहकांना प्रमाणित ५+५+५ पॅकेज देण्यात येईल, म्हणजेच मर्यादित किलोमीटर्ससह पाच वर्षांची वॉरंटी, पाच वर्षांचे रोडसाइड असिस्टण्स आणि पाच लेबर-फ्री पीरियोडिक सर्विसेस.


Previous Post

ट्रूकने ३८ तासांच्या प्लेटाइमसह बीटीजी बीटा इअरबड्स लॉन्च केले

Next Post

बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Next Post

बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ताज्या बातम्या

कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

January 28, 2023

छत्रपती शिवाजी कॉलेजेमध्ये शहीद वीर व राष्ट्रनिर्मात्याना मानवंदना

January 28, 2023

बौद्धजन पंचायत समितीच्या गट क्र. २२ च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

January 28, 2023

“तुम्ही तुमच्या मुलाची जागा वाचवली तरी पुरे”; संजय राऊतांचे CM एकनाथ शिंदेंना आव्हान

January 28, 2023

कीर्तन परंपरेचा आजच्या काळात नव्याने अभ्यास होणे गरजेचे – प्रा. डॉ. धनंजय होनमाने

January 28, 2023

भारतीय बौद्ध महासभा अंकुर बौद्ध विहार शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

January 28, 2023

प्रजासत्ताक दिनी आटपाडीत प्रथमच सागर यांनी केली सत्यशोधक वास्तू पूजन

January 28, 2023

पारसिक बोगद्यामुळे प्रवासातील वेळेत बचत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

January 28, 2023

भ्रष्टाचारमुक्तीचा संकल्प करा – हेमंत पाटील

January 28, 2023

विद्यार्थ्यांनो हसत खेळत परीक्षेला सामोरे जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

January 28, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!