
स्थैर्य, शिर्डी, दि.२३: दिवाळीतील
पाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळं सुरु
करण्यास परवानगी दिली. त्यानंतर शिर्डीतील साई मंदिर भाविकांसाठी खुलं
करण्यात आलं. एरवी 50 हजार भक्त दररोज शिर्डीत दर्शन घेत असत, मात्र
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला 6 हजार भविकच दर्शन घेऊ शकणार
असल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलं होतं. परंतु, सोशल
डिस्टंन्सिंगचा बोजवारा उडत असल्यामुळे आता मात्र गर्दीवर नियंत्रण
मिळवण्यासाठी मंदिर प्रशासनाने कंबर कसली आहे.
गोव्याच्या समुद्र किना-यावर घातक जेलीफिशचा कहर
शिर्डीत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी
आता नवे नियम करण्यात आले आहेत. एका दिवसांत जास्तीत जास्त आठ हजार
भक्तांनाच दर्शन देण्यात येणार आहे. तसेच पास मिळाल्यानंतरच शिर्डीत
येण्याचं आवाहन साई संस्थानाकडून भक्तांना करण्यात आलं आहे. तिरुपती बालाजी
मंदिर संस्थानच्या धर्तीवर केवळ ऑनलाईन पास असणा-या भाविकांनाच दर्शन दिलं
जाणार असल्याच काही दिवसांपूर्वी मंदिर प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात
आलं होतं.