श्रीमंत रामराजेंना विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर; प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटलांची माहिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुन २०२२ । फलटण । विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी ट्विट करून दिलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणत्या उमेदवाराला नक्की संधी मिळणार यामध्ये विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना संधी मिळणार हे नक्कीच होते. श्रीमंत रामराजेंना संधी मिळणार याबाबत सर्वांनाच खात्री होती. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांनी याबाबत अधिकृत ट्वीट करून याबाबतची माहिती दिलेली आहे.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये दोन्ही उमेदवार विजयी होऊन राज्याच्या सेवेसाठी कायम तत्पर राहतील, असे मत जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केलेले आहे.

Back to top button
Don`t copy text!