जागतिक आरोग्य संघटनेचा ‘ग्रेड ३’ इशारा; ‘एल-निनो’मुळे भारत धोक्यात अन् आरोग्यावर मोठे संकट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

जागतिक तापमानवाढ आणि तीव्र ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे आगामी काळात भारतासह जगभरात हवामानात मोठे बदल होणार असून, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या सर्वोच्च ‘ग्रेड ३’ इशाऱ्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. १४ नोव्हेंबर : पॅसिफिक महासागरातील तापमानवाढीमुळे उद्भवलेल्या ‘एल-निनो’ संकटाचा धोका वाढल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) २०२६-२७ या कालावधीसाठी सर्वोच्च आपत्कालीन ‘ग्रेड ३’ इशारा जारी केला आहे. भारत समेत दक्षिण आशियाई देशांमध्ये याचा गंभीर परिणाम होऊन तीव्र उष्णतेच्या लाटा, पाण्याचे दुर्भिक्ष, कुपोषण आणि ड्युंगी, मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

आरोग्यावर व शेतीवर होणारे परिणाम

एल-निनोच्या प्रत्यक्ष परिणामांमुळे हवामानात मोठी तफावत निर्माण होत असून, काही भागात भीषण दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. या हवामान बदलामुळे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होऊन जलजन्य आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. तसेच तापमानात होणाऱ्या बदलांमुळे डासांची उत्पत्ती वाढून ड्युंगी आणि मलेरियाचा धोका भारतासाठी उच्च श्रेणीत असल्याचे डब्लूएचओने स्पष्ट केले आहे.

आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आवाहन केले आहे. शेती आणि अन्न सुरक्षेवरही याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून, प्रशासकीय स्तरावर योग्य पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!