कॉमेडिअन भारती सिंहच्या मुंबईतील 3 घरांवर NCB च्या धाडी; पतीसोबत ड्रग्सचे सेवन करत असल्याचा आहे आरोप


 

स्थैर्य, मुंबई, दि.२१: प्रसिद्ध विनोदी कलाकार भारती
सिंहच्या घरावर (NCB) अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी धाड
टाकली आहे. भारती आणि तिच्या पतीवर अमली पदार्थांचे सेवन केल्याचे आरोप
आहेत. NCB ने या दोघांना समन सुद्धा जारी केला. एका अमली पदार्थ तस्कराच्या
चौकशीत या दोघांची नावे समोर आली होती. त्यानंतर भारतीच्या अंधेरी,
लोखंडवाला आणि वर्सोवा येथील तिन्ही घरांवर रेड टाकण्यात आली. विशेष
म्हणजे, या धाडीत NCB च्या टीमने अमली पदार्थ जप्त देखील केला आहे.

बॉलिवूड आणि ड्रग्स

अभिनेता
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच बॉलिवूडमध्ये
ड्रग्सच्या तपासाला वेग आला. यामध्ये आतापर्यंत अनेक सिलेब्रिटींना समन्स
बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यामध्ये दीपिका पादुकोण आणि तिच्या
मॅनेजरसह नावाजलेल्या कलाकारांचा समावेश होता. नुकतेच ड्रग्स प्रकरणात 20
नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपाल चौकशीसाठी NCB कार्यालयात पोहोचला होता. या
ठिकाणी त्याची ड्रग्स प्रकरणात चौकशी करण्यात आली. अर्जुनसह त्याच्या सोबत
लिव्ह इनमध्ये राहणारी गॅब्रिएला डेमेट्रिएड्स हिची दोन दिवस चौकशी झाली.
या चौकशीनंतर कोर्टाने अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टेलला 25 नोव्हेंबर
पर्यंत न्यायालयीन कौठडीत पाठवले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!