भाजपाचे संग्राम देशमुख यांना फलटण तालुक्यातून मताधिक्य देणार : जयकुमार शिंदे


 

स्थैर्य, फलटण,  दि.२१: पुणे पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना पदवीधर मतदारसंघासाठी फलटण तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देणार असून पुणे पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा कायम राहिला आहे. व या पुढेही भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून येणार याची खात्री सर्वांना आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे व्यक्त केले.

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुका भारतीय जनता पक्षाची फलटण येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भरत मुळे यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग संपन्न झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मनोज कलापट, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, सुरेश निंबाळकर, जिल्हा सचिव मुक्ती शहा यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. 

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कशा पद्धतीने देता येईल. यावेळी प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन आपल्या उमेदवाराची भूमिका समजावून सांगावी हा मतदारसंघ पारंपारिक भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळे या मतदारसंघांमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येईल, यामध्ये कसलीही शंका नाही. परंतु कार्यकर्त्यांनी गाफील न राहता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हात बळकट करण्यासाठी तालुक्यामधून जास्तीत जास्त मताधिक्य पदवीधर व शिक्षक उमेदवारांना देऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजयी करायचे आहे, असेही जयकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस भरत मुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्यापासून कशा पद्धतीने काम केले पाहिजे. याचे मार्गदर्शन केले. प्रत्येक पन्नास मतदारामागे एक पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन उमेदवारांचा प्रचार करायचा आहे. तसेच मतदारांना मतपेटी पर्यंत आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे व या विजया मध्ये फलटण तालुक्याचा सिंहाचा वाटा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 

प्रास्ताविक नगरसेवक सचिन अहिवळे यांनी केले व आभार युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संदीपकुमार जाधव यांनी मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!