राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) कडून ‘घरोघरी राष्ट्रवादी’ अभियान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) कडून ‘घरोघरी राष्ट्रवादी’ अभियान राबविण्यात येणार असून फलटण तालुयातील २० महत्त्वाच्या गावांची यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात येऊन त्यांनी घरोघरी जाऊन हे अभियान राबवायचे आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (खासदार शरद पवार) जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांनी दिली.

फलटण येथील जिद्द या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत जेष्ठ नेते सुभाष शिंदे बोलत होते.

या अभियानाबाबत अधिक माहिती देताना सुभाष शिंदे म्हणाले की, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदाराच्या दारात गेल्यानंतर त्यांना नमस्कार करून आपली ओळख सांगावी व २ मिनीट चर्चेसाठी वेळ मागावा.

मतदाराने परवानगी दिल्यानंतर खा. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या प्रमुख कामांची माहिती मतदाराला देण्यात यावी. तसेच पॉकेट कॅलेंडर देण्यात यावे.

सध्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कलुषित करण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. दोन पक्षांना फोडून महाराष्ट्राच्या अस्मितेला धका लावण्यात येत आहे. दिल्लीश्वरांनी रचलेल्या या कटाला चोख उत्तर देण्यासाठी व महाराष्ट्राच्या रखडलेल्या विकासाला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी पवार साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची आज गरज आहे. यासाठी आपली साथ मोलाची आहे, असे सांगावे व आपली बाजू पटवून द्यावी.

जर मतदाराने साथ देण्यास होकार दिल्यास त्यांच्याकडून एक ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे किंवा त्यांना त्यांच्या मोबाईल नंबरवरून ७०३०१२००१२ या नंबरवर मिस्ड कॉल द्यायला सांगायचे आहे. पुढे मेसेजद्वारे प्राप्त लिंकद्वारे हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. पाचवी प्रक्रिया – ‘मी महाराष्ट्रवादी’ हे स्टिकर त्यांच्या दरवाजावर चिकटवण्याची परवानगी घेऊन ते स्टिकर योग्यरीत्या चिकटवायचे आहे.

मागील ९ वर्षात भाजप सरकारने कशाप्रकारे आपली फसवणूक केली आणि सामान्यांच्या समस्यांकडे पाठ फिरवली, याची माहिती देणारे पत्रक हे मतदाराला द्यावे.

पुढे त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करून द्यायचे आहे. जेणेकरून ते पक्षाशी संबंधित दैनंदीन घडामोडींचे विविध अपडेट मोबाईलवर मिळवू शकतील व पक्षाशी जोडले जातील.

यावेळी जर मतदाराने विरोध केला आणि समर्थन देण्यास नकार दिला, तर नम्रपणे त्यांनी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानायचे आहेत.

या अभियानांतर्गत आपण दारावर स्टिकर लावतानाचा व्हिडिओ काढून तो आपल्या फेसबुक/ट्विटरवर/इन्स्ट्राग्राम सारख्या इतर समाजमाध्यमांवर पोस्ट करावा. जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यत याची माहिती पोहोचेल, तसेच पक्षीय कार्यालयाकडून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात येईल.

अभियानासाठी फलटण तालुयातील निवडलेल्या २० गावांची यादी अशी :

  1. विडणी
  2. माझेरी
  3. साखरवाडी
  4. तरडगाव
  5. गुणवरे
  6. कोळकी
  7. सांगवी
  8. आसू
  9. राजुरी
  10. बरड
  11. गिरवी
  12. परहर खुर्द
  13. पाडेगाव
  14. निंबळक
  15. राजाळे
  16. हिंगणगाव
  17. परहर बु.
  18. दुधेबावी
  19. सरडे
  20. मुंजवडी

Back to top button
Don`t copy text!