आगामी लोकसभा जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी हिटलरप्रमाणे वागतील – प्रकाश आंबेडकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑक्टोबर २०२३ | सातारा |
आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरने केले ते सगळे करण्याची शक्यता आहेत. दिवाळीपूर्वी अटकसत्र सुरू होणार असून, ते निवडणुकीपर्यंत राहील. गोध्रा हत्याकांड, मणिपूर दंगल घडली, त्याप्रमाणे पुन्हा घडण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप ‘वंचित’चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ’इंडिया’मध्ये दुफळी असून, त्याचा फायदा नरेंद्र मोदी घेतील. सर्वांनाच स्वतंत्र निवडणुका लढवण्यास भाग पाडतील, असेही अ‍ॅड. आंबेडकरांनी सूचित केले.

संविधान जनजागृती विचारमंचतर्फे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची येथे सभेचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त येथे आले असता त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणूक जिंकावी, यासाठी नरेंद्र मोदी हे हिटलरने जे केले तेच करणार आहेत. जो विरोधात जाईल त्याचा आवाज दाबला जाईल. देशातील पाच हिंदू मंदिरांवर कारवाया करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी मिलिटरीच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी मी केली. तेथे बॉम्ब फोडून हिंदू- मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न होता. मात्र, तो बॉम्ब नि:शस्त्र केला. सध्या मुस्लिम घरात हिंदू मुलगी, हिंदू घरात मुस्लिम मुलगी आहे का, याचा शोध आरएसएस घेत आहेत. प्रेमविवाह न राहता ते आता धार्मिक विवाह झाले आहेत. लोकांची डोकी भडकवण्याची राजकीय खेळी सुरू आहेत.

गलवान खोर्‍यात भारतीय आणि चीन सैन्य भिडले, तेव्हाच चीनमधून पैसे येवून देशविरोधी कारवाया केल्या जात होत्या. युध्द सुरू असताना कोणता निधी येत होता, याचा खुलासा नरेंद्र मोदी यांनी करावा. तो न्यायालयात सिध्द होईल की नाही, हा वेगळा भाग आहे, असेही आंबेडकरांनी सांगितले.

आंबेडकर म्हणाले, ‘इंडिया’ आघाडी शेवटपर्यंत टिकावी, ही अपेक्षा आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आमच्यावर कोणत्याही चौकशा नाहीत. त्यामुळे आम्ही बेधडक भूमिका घेत आहोत. ‘इंडिया’च्या बैठकीत खा. राहुल गांधी यांनी अदानीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात आहे, अशी भूमिका मांडली. राष्ट्रवादी त्या भूमिकेबरोबर आहे, असे दिसत नाही. त्याबाबत अधिकृत निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा, त्याचा मोठा फायदा नरेंद्र मोदी घेतील. ‘इंडिया’ने ‘वंचित’ला घेतले नाही, तर मोदी ‘इंडिया’ला संपवतील.

राज्यात खासगीकरण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदेही कंत्राटी पद्धतीने भरावीत. बेरोजगारासाठी रोजगार देण्यासाठी शासनाकडे योजना नाही. कंत्राटी कर्मचारी भरले आहेत. लोकसभा आणि विधानसभेत ‘वंचित’ला सत्ता मिळाल्यास कंत्राटी कर्मचार्‍यांना कायमस्वरुपी कर्मचारी करणार आहे. ग्रामसेवक पदभरतीत टीसीआय कंपनीने १२० कोटींचा नफा कमवला. राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबविली पाहिजे. हे चोरांचे राज्य आहे. कंत्राटी पध्दतीला घटनेने वाव दिला नाही. कंत्राटदार कामगारांना दिला जाणारा पगार बेकायदेशीरपणे दिला जात आहे. राज्यात खासगीकरण सुरू झाले आहे. एकनाथ, अजितदादा आणि फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे कंत्राटी पद्धतीने भरावीत, अशी टीका आंबेडकरांनी केली.

नांदेड येथील घटना दुर्दैवी आहे. अधिकार्‍यांवर कारवाई करणार नाहीत. अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्र्यांमध्ये मिलीभगत आहेत. भ्रष्ट आमदार व खासदारांना बदलून नवी पिढी आली पाहिजे, असेही ते म्हणाले.

सनातन धर्माविरोधात समाजामध्ये प्रचंड मोठी लाट आहे. महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर भागात ब्राह्मणविरोधी मोहिम सुरू झाली होती. सनातन धर्मात शुद्रता, अतिशुद्रता का आहे, हे जाहीर करावे. हिंदू धर्मातील वारकरी संप्रदाय सनातनविरोधात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

नांदेड येथील घटना दुर्दैवी आहे. अधिकार्‍यांवर कारवाई करणार नाहीत. मिलीभगत आहेत. भ्रष्ट आमदार व खासदार नवीन लॉट येऊ द्या. परिस्थिती गलिच्छ सुरू आहे. ठेकेदार, आमदार, मंत्री यांच्यात मिलीभगत आहे, असा आरोप आंबेडकरांनी केला.

मोदी हुशार आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र घेवून एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार यांना आपल्याबरोबर जोडून घेणार नाहीत, असे सांगत त्यांनी एकत्रित निवडणुकीचा मुद्दा फेटाळला. दरम्यान, सातार्‍यातील भिमाई स्मारक रखडलेले आहे. ते करण्याची सरकारची मानसिकता नाही. त्यामुळे काही मुद्दे हाती न घेण्याचे आम्ही ठरविले असल्याची कबुलीही आंबेडकरांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!